अखेर पालकमंत्र्यांची सावर्डे गावाला भेट : पिडीत कुटुंबाचे सांत्वन आणि आर्थिक मदत
मोखाड्यातील सावर्डे गावात १० दिवसांच्या आत २ आदिवासी बालकांचा कुपोषणानं मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडूनही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या घटनेची दखल घेतली नव्हती यानंतर पालकमंत्री यांची कुपोषणाकडे पाठ या आशयाची बातमी MaxMaharashtra ने प्रसिध्द केल्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री चव्हाण यांनी सावर्डे गावाला भेट देत संबंधित दोन्ही कुटुंबांची आस्थेने चौकशी करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. वेळेआधीच मंत्री आल्याने भाजप पदाधिकारी आणि प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली होती.

काही दिवसांपुर्वीच मोखाडा तालुक्यातील सावर्डे या गावात अगदी १० दिवसांच्या आत २ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.यावेळी यागावाला तसेच पिडीत कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आमदार खासदार सर्व समिती सभापती यांनी भेटी देवून आपल्या परीने मदत आणि या घटनेची दखल घेतली होती.अशावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या घटनेची दखल घेतली नव्हती यानंतर पालकमंत्री यांची कुपोषणाकडे पाठ या आशयाची बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री चव्हाण यांनी सावर्डे गावाला भेट देत संबंधित दोन्ही कुटुंबांची आस्थेने चौकशी करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
यावेळी अगदी पहाटे सकाळीच चव्हाण हे यागावात पोहचले यावेळी मृत बालकांच्या पालकांशी चर्चा करून सर्व घटनेची माहिती घेतली यावेळी आर्थिक मदतही त्यांनी केली.कुपोषण वाढवण्यामागे स्थलांतर हा मुद्दाही किती महत्वाचा आहे याकडेही उपस्थित ग्रामस्थांनी मंत्री चव्हाण यांचे लक्ष वेधले त्याच प्रमाणे बांधकाम विभाग कृषी विभाग वनविभाग या विभागांकडुन नरेगाची कामे देण्यास कुचराई होत असल्याचेही यावेळी समोर आले यासर्व घटनेची माहिती घेवून यावर उचीत कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले या दौऱ्यात उपस्थित आमदार सुनिल भुसारा यांनी सावर्डे वरुन शहापूर कडे जाणाऱ्या मदीवर मोठा पुल होणे आवश्यक असल्याचे सांगितले यावर तात्काळ कार्यवाहीचे संकेत चव्हाण यांनी दिले.
यावेळी भाजपचे प्रदेश पदाधिकारी हेमंत सवरा,जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे,भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद , कॉंग्रेचे अध्यक्ष जमशीद शेख,बाबजी काठोळे उपसरपंच उमेश येलमामे दिलीप जागले आदि पदाधिकारी तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वेळे आधीच मंत्री आल्याने पदाधिकाऱ्यांची तारांबळ प्रशासनाची धावपळ
सकाळी ८:३० वाजता सावर्डे गावाला भेट असा दौरा असल्यामुळे एवढ्या सकाळीच मंत्री महोद्यांच्या सोबत जाण्यासाठी काहि महत्त्वाचे पदाधिकारी उत्सुक असतात.मात्र मंत्री ७:३० लाच घटनास्थळी पोहचल्याने मात्र पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली यामुळे मंत्र्याच्या मागून धावपळ करीत कसेबसे पदाधिकारी पोहचले तर दुसरीकडे प्रशासनाचीही धावपळ होवून पहिल्या कुटुंबाला भेट दिली त्यानंतर बरेचशे अधिकारी पोहचले यामुळे चव्हाण यांच्या वेळपाळण्याच्या सवयीची चर्चा होती.तर कधीच वेळेवर न पोहचणार्या पदाधिकाऱ्यांसाठी हि चपराक होती.