राज्यात कोरोनाचा महा-कहर

Update: 2021-03-28 16:31 GMT

जागतिक महामारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रात रोज नवे उच्चांक गाठले जात असून आज दिवसभरात राज्यात १०८ रूग्णांचा मृत्यू झाले तर आजपर्यंतचे सर्वोच्च ४० हजार ४१४ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये झपाट्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून हा एक प्रकारे कोरोना संसर्गाचा आता अतिउद्रेक झाला आहे. आजपासून राज्यात रात्रीची संचारबंदी सुरू झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील आठवड्यात संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेतच, शिवाय मृत्यूंच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे.एका बाजूला विरोधी पक्ष नेत्यांच्या आरोपामुळे आघाडी सरकार अस्थिर असताना राज्य शासनासमोर करोना संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

आज दिवसभरात राज्यात १०८ रूग्णांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून राज्यात सर्वाधिक असे एकाच दिवसात ४० हजार ४१४ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.ही गेल्या काही दिवसातील सर्व आकडेवारी असून सध्या राज्यातील मृत्यूदर २ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,२५,९०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज १७ हजार ८७४ रुग्ण देखील बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३,३२,४५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.९५ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९३,५८,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,१३,८८७४ (१४.०२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,५६,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

रात्रीचा संचार बंद साठी राज्यभर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला असून होऊन मदत आणि पुनर्वसन विभागाने पुढील आठवड्यातील संपूर्ण लॉकडाऊसाठी कार्यप्रणाली निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे.

Tags:    

Similar News