उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, एकनाथ शिंदे- अजित पवार गटात यांच्यात खडाजंगी

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या घटनेला महिना उलटला नाही तर आताच एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट आमने-सामने आले आहेत.;

Update: 2023-07-22 06:10 GMT

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेला एक महिना उलटला नाही. त्यातच अजित पवार गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट आमने-सामने आले आहेत.

अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे ट्वीट अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. त्यावरून शिवसेना प्रवक्ते संजीव भोर यांनी अमोल मिटकरी यांना टोला लगावा आहे.

संजीव भोर म्हणाले, अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी अमोल मिटकरी फारच उतावीळ झालेले दिसतात. उथळ पाण्याला खळखळाट फार, असंच मिटकरींचे हे वर्तन आहे. आपण महायुतीतील एक घटक पक्ष आहोत याचे तारतम्य मिटकरींनी पाळले पाहिजे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, असं मिटकरंचं झालं आहे, अशी टीका संजीव भोर यांनी केली. त्यामुळे सत्तेत सहभागी होण्याच्या घटनेला महिला पूर्ण झाला नाही तोच शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट यांच्यात कुरबूर सुरु झाली आहे.

  

Tags:    

Similar News