नमस्कार ,
मी कुणी वक्ता नाही तर मी एक लेखिका आहे. मी देहरादून मध्ये खाजगी आयुष्य जगते. एवढ्या लोकां समोर येणं माझ्यासाठी खुप नवीन आहे. तुम्हा सर्वांचे खुप खुप धन्यवाद. तुम्ही माझी साथ दिली आणि तुम्ही माझ्या भाषणाला सुद्धा समर्थन दिले. मी ऐकलंय कि माझी मराठी अनुवादित पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रात वाचली जातात. यवतमाळच्या साहित्य संमेलनातलं माझं प्रस्तावित भाषणाचा मराठी अनुवाद करून तो सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांनी सभा घेऊन त्यात वाचून दाखवलं.
मला खुप आश्चर्य वाटतं की माझं भाषण एवढ्या लोकांनी वाचलं जे भाषण मी संमेलनात देऊ शकले नाही. मला खुप काही बोलायचं पण एकच शब्द माझ्या मनात येतो तो म्हणजे खुप खुप धन्यवाद. हि एक विचित्र गोष्ट आहे कीं कोणत्याच ठिकाणी हे घडलं नाही. म्हणून मला बोलावंसं वाटतं "जय महाराष्ट्र"
पण एका गोष्टीची खुप खंत आहे , कि या मुंबई सारख्या महानगरामध्ये स्वातंत्र्याच्या दमनाबद्दल सिनेसृष्टी बोलली नाही. काही लोकं बोलली असतील सुद्धा पण सिनेसृष्टी मात्र काहीच बोलली नाही.
माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगते, माझं बालपण ब्रिटिशांच्या सत्ताकाळात गेले. त्या काळात चित्रपटांची खुप मदत झाली स्वातंत्र्यासाठी. त्या दिवसांमध्ये स्वातंत्र्य या शब्दाला सुद्धा सेन्सॉरशीप (SENSORSHIP) होती. स्वातंत्र्य शब्द उच्चारायला सुद्धा मनाई होती. स्वातंत्र्यासाठी बोलणं आणि लढणं म्हणजे सरळ तुरुंग ,प्रत्यार्पण किंवा मृत्यु असा तो काळ होता. तसंच स्वातंत्र्यावर बोलण्यासाठी सुद्धा खुप भयंकर असा तो काळ होता.
मला आठवतंय की, लहानपणी मी अशोककुमार यांचा एक चित्रपट पाहिला होता" नया संसार" आता त्यामध्ये संवादामध्ये तर स्वातंत्र्याबद्दल बोलू शकत नव्हतेच पण त्या दिवसात स्वातंत्र्याची कल्पना निर्माते-दिग्दर्शकांनी गाण्यामधून प्रकट केली आणि अशा प्रकारे त्यांनी सेन्सॉरशिप पास केली. मी त्यावेळी वडीलांना विचारले की हे कसे घडले. बापू म्हणाले 'संगीतामुळे काही होऊ शकत. त्या गाण्याचे बोल होते ‘’ एक नया संसार बनायें, ऐसा एक संसार जिसमे धरती हो आझाद जिसमे भारत हो आझाद, जनता का राज जगत मे, जनता कि सरकार’’ या गाण्याने लहानपणात माझ्यावर खुप प्रभाव केला जे मला आजही आठवते. हे सगळं तेव्हा होतं होतं.
पण आज संपूर्ण शांतता आहे. हा काही लोकं आहेत आनंद पटवर्धन यांच्यासारखी ज्यांनी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार परत केला पण बाकीचे शांत आहेत.
पण देहराडून मध्ये असताना एक आवाज ऐकून खुप वाईट वाटलं तो आवाज म्हणजे नसिरुद्दीन शहांचा. त्यांनी जी काळजी व्यक्त केली ती त्यांच्या मुलांसाठी नव्हे तर देशातल्या मुसलमानांच्या सुरक्षेसाठी. आजकाल निर्दोष लोकं मारली जातात का तर ते मुसलमान आहेत. रोज निर्दोष लोकं तुरुंगात डांबली जातात का तर ते मुसलमान आहेत. हे सगळं तुम्ही रोज वाचता ना वर्तमानपत्रांमध्ये, मला तर हे बघवत नाही. मी जेव्हा नसिरुद्दीन शहांचा आवाज ऐकला तेव्हा मी विचार केला की, कुणी मोठा अभिनेता कलाकार का नाही बोलला शहांच्या वक्तव्यावर ? त्यांनी नाही ऐकला का नसिरुद्दीन शहांचा आवाज. ते तेव्हा दुसऱ्यांच्या आवाजावर नाचत होते. हे लोकं आपलं मनोरंजन करतात त्यांच्यातला एक हि कलाकार नसिरुद्दीन शहांचा समर्थनात पुढे आला नाही ? मला माफ करा पण मला हे आवडलं नाही. आता माझ्याकडेही काही नाही उरलं तुम्हाला बोलायला. आपण खुप भयंकर काळात जगत आहोत आणि अशावेळी शांत राहणं त्याहून भयंकर आहे .
कारण आता जर आपण शांत बसलो तर परिस्थिती खुप आहे त्यापेक्षा भयावह होईल आता तर निवडणुका ही येत आहेत ते आपल्या राष्ट्राला हिंदुराष्ट्र बनवत आहेत आपलं हे हिंदुराष्ट्र नसून बहुसांस्कृतिक, विविध परंपरा आणि नागरिकत्वं जपणारं राष्ट्र आहे, अशी परंपरा जपणारे आपण एकमेव आहोत आणि समृद्ध आहोत आता ते आपल्याला एकाच परंपरेत डांबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला आपली समृद्धता गमवयाची नाहीये. आपण एकत्र हिंदुस्थानी आहोत आपण आपली हिंदुस्थानीयत नाही सोडायची...