सुभाषचंद्र बोस विषयी कंगणाने केले खळबळजनक वक्तव्य...! काय म्हणाली? वाचा

Update: 2024-04-05 11:19 GMT

बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रणौत हिला नेहमीच विविध सिनेमांमधून अभिनय करताना आपण पाहिलं आहे. आपल्या सामाजिक आणि राजकीय वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अशातच कंगणाने केलेल्या एका खळबळक विधानामुळे, पुन्हा एकदा नव्या वादात तिने स्वतःला अडकवलंय.

"टाईम्स नाऊ समिट"ला दिलेल्या एका मुलाखतीस कंगणाने केलेल्या या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. कंगणा बोलताना म्हणाली की, "मला आधी एक गोष्ट स्पष्ट करू द्या की, भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस कुठे गेले?" कंगणाने केलेलं हे वक्तव्य सोशल मिडियासह अन्य माध्यमांमध्ये चांगलंच व्हायरल होत असून कुणी विरोध, तरी कुणी तिची खिल्ली उडवत आहेत. काही जणांनी तर तिची तुलना आलिया भटशी केली आहे.

दरम्यान, कंगणानाच्या या वक्तव्यावर सिने अभिनेते प्रकाश राज यांनी देखील जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, "हे असले सुप्रिम जोकर पार्टीचे विदुषक...किती मोठा अपमान..." अशा शब्दांत प्रकाश राज यांनी टीका केली. कंगणाने केलेल्या या वक्तव्यामुळे तिच्यावर अनेक स्तरातून टीका होत आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव न घेता कंगणाने सुभाषचंद्र बोस यांचं नाव घेतलं, तिच्या या वक्तव्यामुळे ती सार्वजनिकरित्या सोशल मिडियावर माफी मागणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News