अमरावतीत राणांकडून दुसऱ्यांदा फसवणूक, सभेला बोलावून महिलांचा बूडवला रोजगार

Update: 2024-04-05 15:30 GMT

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांकडून विजयी होण्याच्या तयारीने मोठ्या जोमाने सभा घेतल्या जात आहेत, तर काही ठिकाणी या सभेला सामान्य जनता येत नसल्याने त्यांना पैशाचं अमिष दाखवून सभेला बोलावलं जात आहे. अशीच घटना अमरावती लोकसभा मतदारसंघात घडली आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आपल्या मतदारसंघातील हातावरचं पोट असणाऱ्या, सर्वसामान्य मोजमजुरी करून खाणाऱ्या महिलांची फसवणूक केल्याचे समोच आले आहे. अमरावतीमधील दसरा मैदानात झालेल्या सभेसाठी मोजमजूरी करणाऱ्या गरीब महिलांना दुप्पट रोजगार देऊ, असं अमिष दाखवून बोलावण्यात आलं, पण सभा पार पडल्यानंतर आपल्याला काहीही पैसे दिले गेले नाही असा रोखठोक दावा या महिलांनी केला आहे.

यासंदर्भात राणांचे सहाय्यक संदीप ससे यांनी हा खोडसाळपणा असल्याचे सांगितले आहे, अशा पध्दतीने कोणालाही पैशाचं अमिष देऊन आम्ही बोलावलेलं नव्हतं, असं संदीप ससे म्हणाले.

भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या दसरा मैदानातील सभेचा नारळ फुटला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजपाचे दिग्गज नेते या सभेला उपस्थित होते. सभेला जास्तीत जास्त जनसमुदाय दिसावा यासाठी जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आणण्यासाठी आलं होतं.परंतु यापैकी काही नागरिकांनी पैशाचं अमिष देऊन बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सभा झाल्यानंतर, आलेल्या काही महिलांनी सांगितलं की, आम्ही मोलमजूरी करणाऱ्या महिला असून आम्हाला, "तुमच्या रोजापेक्षा दुप्पट पैसे देऊ, तुम्ही सभेला आलात तर, तुम्हाला एक हजार रुपये देऊ" असं आम्हाला सांगण्यात आले होते, पण प्रत्यक्षात सभा संपल्यावर काहीच पैसे दिले नाहीत, असा दावा या महिलांकडून करण्यात येत आहे.


Tags:    

Similar News