वऱ्हाडी बोलीत राजकीय मुलाखती घेणाऱ्या श्रुतिका गावंडे यांची खास मुलाखत

Update: 2024-04-21 06:21 GMT

वऱ्हाडी बोली भाषेत राजकीय मुलाखती घेणाऱ्या आणि सामान्य माणसांना जिव्हाळ्याच्या विषयावर बोलत्या करणाऱ्या श्रुतिका गावंडे यांचं 'विदर्भाची श्रुतिका' (Vidarbhachi Shrutika) हे यु ट्युब चॅनल (यौतुंबे Channel) लोकसभा निवडणुकीत चांगलंच चर्चेत आलं आहे. त्यांचे व्हिडिओ आता व्हायरल व्हायला लागले आहेत.याचं कारण म्हणजे त्यांची शैलीदार वऱ्हाडी भाषा.श्रुतिका गावंडे यांना बोलतं केलं मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी.

श्रुतिका गावंडे हीने आपलं "विदर्भाची श्रुतिका" हे युट्युब चॅनेल सुरू करण्याअगोदर पत्रकारितेमध्ये उच्च पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर पूणे येथे एबीपी माझा या न्यूज चॅनेलची इंटर्नशीप केलेली आहे. याशिवाय वेगवेगळ्या लोकल न्यूज चॅनेलमध्ये सुध्दा श्रुतिकाने काम केलेलं आहे आणि याच अनुभवाच्या जोरावर तिने हे युट्युब चॅनेल सुरू केलेलं आहे. तिच्या या प्रवासाबद्दल तिने मॅक्स महाराष्ट्र ला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर चर्चा केली आहे


Full View

Tags:    

Similar News