प्रेम करायला जागा नाही.. कोट्यवधी लोकांची गर्दी आणि या गर्दीचा पहारा.. प्रेम करण्यासाठी शहरांमध्ये वेगळ्या जागा असल्या पाहिजेत. १० बाय १० च्या खोलीत दोन- तीन जोडपी राहतात, त्यांच्यात एकमेकांना स्पेस देण्यासाठी तयार झालेलं सिग्नलीॅग आणि कोड लँग्वेज याचे किस्से सांगतानाच ऑनर किलींग म्हणजे फक्त खून नाही तर घटनेने दिलेल्या अधिकाराचा संकोच आहे त्यामुळे तरूणांवर प्रेम करत असताना समाजमन बदलायची नवीन जबाबदारी पार पाडली पाहिजे असं मत रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केलंय. पुण्यात ‘राईट टू लव्ह’ या संस्थेनं व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलं.