शेतकरी बंधूंनो, असा सोडवा सोयाबीन बियाण्याचा तिढा

महागाई आणि धार्मिक मुद्यांनी समाजमन ढवळून निघत असताना जनतेच्या मूलभूत प्रश्नांचा विसर पडत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढत असताना आगामी खरिपासाठी सोयाबीन बियाण्याचा प्रश्‍न आ वासून उभा राहिला आहे. कृषी विभागाचे कर्मचारी नारायण घुले यांनी... घरच्या घरी एकरी तीन हजार रुपये वाचवण्याचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला दिलेला अनमोल सल्ला...

Update: 2022-04-21 08:54 GMT

महागाई आणि धार्मिक मुद्यांनी समाजमन ढवळून निघत असताना जनतेच्या मूलभूत प्रश्नांचा विसर पडत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढत असताना आगामी खरिपासाठी सोयाबीन बियाण्याचा प्रश्‍न आ वासून उभा राहिला आहे. कृषी विभागाचे कर्मचारी नारायण घुले यांनी... घरच्या घरी एकरी तीन हजार रुपये वाचवण्याचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला दिलेला अनमोल सल्ला...



 


सोयाबीन बियाणे चा भाव किती राहील यावर्षी???

सोयाबीन चा बाजारात 70 ते 80 रुपये किलो पर्यत विक्रीसाठी भाव आहे पण आता येणाऱ्या खरिपात शेतकरी जेव्हा पेरणीसाठी सोयाबीन बियाणे म्हणून पिशवीतले सोयाबीन बियाणे खरेदी करायला जाणार त्यावेळी हेच बियाणे कमीत कमी 150 ते 200 रुपये किलोने विकले जाणार आहे म्हणजे 30 किलोची सोयाबीन बियाणे हे 4500 ते 6000 रुपयांपर्यंत विकली जाणार यावर्षी...!!😢😢 वेगवेगळ्या कंपनीनुसार हे दर वेगवेगळे असतील...

पण याला उत्तर काय???

खरिपाच्या सुरुवातीला पेरणीसाठी सर्वच शेतकरी बंधूंना खूप कमी वेळ असतो त्यावेळी खते बियाणे यांची खरेदीसाठी धावपळ सुरू होते त्याचवेळी जास्त विचार न करता जे उपलब्ध होईल ते शेतकरी खरेदी करतो आणि पेरणी आटोपतो... तसेच यावर्षी सोयाबीन चे दरही यावर्षी 60 ते 80 रुपये किलो होते त्यामुळे साहजिकच प्रत्येक शेतकरी हा सोयाबीनकडे वळत आहे त्यामुळे मार्केटमध्ये सोयाबीन बियाणे कमतरता दाखवून तसेच भाव जास्त आहे हे दाखवून शेतकऱ्यांकडून बियाणे च्या नावाखाली लुटालूट सुरू होणार आहे तेव्हा सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती की खालीलप्रमाणे सोयाबीन बियाणे बाबत नियोजन करून खरिपाच्या घाईत होणारी आर्थिक लुट आपण थांबवू शकता...

१. मागील वर्षीच्या सोयाबीन जर आपल्याकडे शिल्लक असेल तर त्यापैकी आपल्याला जेवढे बियाणे पाहिजे तेवढे बाजूला ठेवा त्याची उगवण चाचणी घरीच घेऊ शकता...

२.जर तुमचे स्वतःचे मागील वर्षाचे बियाणे नसेल तर आपल्या गावातच ज्या कोणत्याही शेतकऱ्यांकडे घरगुती चांगले सोयाबीन बियाणे असेल त्यांच्याकडून आजच खरेदी करून ठेवा..

हे घरगुती सोयाबीन बियाणे ची उगवण चाचणी घरीच घ्या याबाबत खूप सोपी पध्द्त आहे. यात आपला फायदा हा एकरी 3000 रुपयांपर्यंत बचत होईल.

(उन्हाळी सोयाबीन चे बियाणे खरेदी करताना त्या प्लॉटला व्हायरस आलेला नव्हता ना हे पाहूनच बियाणे खरेदी करा तसेच बियानेची बॅगची आदळआपट करू नका नाहीतर उगवण कमी होईल.)

नारायण घुले दि २१.०४.२०२१

Tags:    

Similar News