Happy independance day..Happy republic day असं म्हणत दरवर्षी राष्ट्रीय सणांच्या शुभेच्छा दिल्या जातात. परंतू १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन्ही ऐतिहासिक दिवसांचे ऐतिहासिक महत्व आहे. नेमका या दोन दिवसांमधील फरक अनेकांना ठाऊक नाही. explainer च्या माध्यमातून यातील नेमका सोप्या शब्दातील फरक स्पष्ट करण्याचा max maharashtra चा एक प्रयत्न...
आज प्रजासत्ताक दिन- २६ जानेवारीला देशात राज्यघटना लागू झाली होती. पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती म्हणून देशाची सूत्रं हाती घेतली होती. स्वातंत्रदिन- १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र मिळालं होत. या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती.
ध्वजारोहण आणि झेंडावंदनातील फरक ध्वजारोहण- १५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळालं होत. या दिवशी ब्रिटीश युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा डौलाने फडकावण्यात आला होता. स्वातंत्रदिनाला झेंड्याच्या खाली तिंरगा बांधलेला असतो. या ध्वजाला दोरीने खालून वर नेले जाते आणि फडकवला जातो. या प्रक्रियेला ध्वजारोहण असं म्हणतात. १५ ऑगस्टला ध्वजारोहण केलं जातं.
२६ जानेवारीला देशात संविधान लागू झालं होतं. त्यापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट १९५३ नुसार देशाचा राज्यकारभार केला जात होता. २६ जानेवारीला वर बांधलेल्या ध्वजाला केवळ फडकावलं जात. म्हणजेच झेंडावंदन केलं जात. पंतप्रधान, राष्ट्रपती १५ ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्याच्या मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहण करतात. पंतप्रधान देशाचे राजकीय आणि लोकनियुक्त प्रमुख आहेत. त्यामुळे स्वातंत्रदिनाला ध्वजारोहण करण्याचा मान पंतप्रधानांचा असतो.
२६ जानेवारी १९५० ला देशात संविधान लागू झालं होतं. राष्ट्रपती देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदनाचा मान राष्ट्रपतींना असतो. राजपथवरच्या परेडची सलामी राष्ट्रपती स्वीकारतात. लाल किल्ला आणि राजपथ स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पंरपरेनुसार लाल किल्ल्यावर होतो. १५ ऑगस्ट १९४७ला देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी लालकिल्याच्या लाहोरी गेटवर तिंरगा फडकावला होता.
तर २६ जानेवारी १९५० मध्ये संविधान लागू झालं. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी साजरा व्हायचा. मात्र १९५५ पासून पहिल्यांदा हा सोहळा राजपथावर पार पडला. त्यानंतर आजपर्यंत दरवर्षी राजपथावरच प्रजासत्ताक दिनाचा सोहळा रंगतो. पंतप्रधान आणि राष्ट्रपतीचं संबोधन १५ ऑगस्टला लाल किल्यावरुन पंतप्रधान देशाला संबोधीत करतात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्टला राष्ट्रपती देशाला संबोधित करतात.
मात्र प्रजासत्ताक दिनाला कुणाचच भाषण होत नाही. स्वातंत्रदिन आणि प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम १५ ऑगस्टला लष्करी परेड, सांस्कृतिक कार्यक्रम होत नाही. तसंच या कार्यक्रमासाठी दुसऱ्या देशांच्या पाहुण्यांना बोलावलं जात नाही. २६ जानेवारीला लष्कर, निमलष्करी दल आणि पोलीस दलाची परेड होते. सर्व राज्यांचे चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. लष्कर, वायूदल आणि नौदल आपल्या शक्ती आणि संस्कृतीचं प्रदर्शन करतात. प्रजासत्ताक दिनाला दुसऱ्या देशांचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जातात. कार्यक्रमाचं समारोप प्रजासत्ताक दिनाचा समारोप २९ जानेवारीला बिटींग रिट्रीट या सोहळ्याने होतो.
तर स्वातंत्रदिनाच्या सोहळ्याचा समारोप त्याच दिवशी होतो. यावर्षी वेगळं काय? १९७३ पासून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इंडिया गेटवर असलेल्या अमर जवान ज्योती स्मारकाला श्रध्दांजली देण्यास सुरुवात केली होती. १९७१ मध्ये पाकिस्तान युध्दात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ ही ज्योत पेटवण्यात आली होती. अलिकडेच केंद्र सरकारनं राजधानी दिल्लीतील इंडिया गेटची ५० वर्षांपासून ओळख बनलेली अमर जवान ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी हलवली आहे. आता ही ज्योत इंडिया गेट ऐवजी राष्ट्रीय युद्ध स्मारक (नॅशनल वॉर मेमोरियल) येथे विलीन करण्यात आली असून तिथे ती प्रज्वलित करण्यात येणार आहे.
यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधे आरोप प्रत्यारोप सुरु आहे.