UPSC-MPSC देऊन अधिकारी झालेल्यांच्या मोटिवेशनल भाषणांनी काय मिळतं?

पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर प्रकाश कोयाडे यांनी आत्महत्यांसंदर्भात एक पोस्ट लिहिली होती, त्यांच्या पोस्टवर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने त्यांना मेसेज पाठवला आहे. हा मेसेज वाचल्यानंतर UPSC- MPSC देऊन अधिकारी झालेल्यांनी मोटिवेशनल भाषणे देऊन महाराष्ट्रातील अख्खी एक पिढी डिप्रेशनमध्ये ढकलली आहे, असे परखड मत डॉ. प्रकाश कोयाडे यांनी व्यक्त केले आहे.;

Update: 2022-09-12 04:56 GMT

पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर प्रकाश कोयाडे यांनी आत्महत्यांसंदर्भात एक पोस्ट लिहिली होती, त्यांच्या पोस्टवर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने त्यांना मेसेज पाठवला आहे. हा मेसेज वाचल्यानंतर UPSC- MPSC देऊन अधिकारी झालेल्यांनी मोटिवेशनल भाषणे देऊन महाराष्ट्रातील अख्खी एक पिढी डिप्रेशनमध्ये ढकलली आहे, असे परखड मत डॉ. प्रकाश पोयाडे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टवरुन साभार....


"मी लिहिलेल्या आत्महत्ये संदर्भातील पोस्टनंतर काहींनी संपर्क केला. एका निराश झालेल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्याने मेसेज पाठवलाय. यातील एकेक वाक्य फार महत्त्वाचे आहे. वाचा आणि ठरवा की आपण यातील कोणत्या टप्प्यावर आहोत.

हॅलो सर,

मी मागच्या अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षा ची तयारी करत होतो. तेव्हा अधिकाऱ्याची motivational भाषणे ऐकण्यात आली अन् मी upsc ची तयारी साठी पुण्यात आलो. सोबत मुक्त विद्यापीठ मध्ये BA साठी admission घेतले अन् तयारी सुरू केली. Graduation झाल्यावर mpsc upsc देण्यास सुरवात केली. Exam देत होतो score थोडा कटऑफच्या जवळ असायचा, अस वाटायचं पुढच्या वेळी पूर्वपरीक्षा नक्कीच निघेल अन् असे करण्यात 4-5 वर्ष सहज निघून गेले. नंतर लॉकडाऊन पडला त्यात 1 वर्ष गेले. 2022 मे मध्ये sti पूर्व परीक्षा निघाली, ती तयारी मी फुल्ल केली पण मेन्स जुलैमध्ये होती. त्यात मला नीट परफॉर्म करता आले नाही, माझा स्कोर कमी आला. जुलैपासून खूप नैराश्य आले आहे.

रात्रीची झोप कमी झाली आहे. भविष्याच्या माझे कसे होईल याची चिंता वाटतेय. Mpsc च्या नादात अनेक सोशल skill acquire करायच्या राहून गेल्या, त्यामुळे मी इतरांपेक्षा मागे आहे असे वाटतेय. मी भविष्यात काहीच करू शकत नाही, आत्मविश्वास कमी झाला. कोणतीच गोष्ट मला जमू शकत नाही. नवीन काही शिकायला बुद्धी विरोध केल्यासारख वाटते. भविष्याचा वेध घेताच येत नाहीये की पुढे नेमके काय करायचे आहे.

माझे जीवन कसे राहील ह्याच विचाराने रात्रीची झोप उडाली आहे. पूर्ण दिवसभरात hardly 3 hr झोप होतेय ती पण खूप गाढ नाही. काहीतरी नवी करण्याची उमेद हरवली आहे असे वाटतेय. अगोदर कोणतीही गोष्ट करण्यासाठी जसा उत्साह होता तसा आता राहिला नाही. घरच्या सोबत सुद्धा नीट बोलणे होत नाहीये या विषयावर. मागचे 10 वर्ष वाया गेलं असे वाटत असल्याने असे वाटतेय की मी dumb आहे आणि जीवनात काहीच करू शकनार नाही अशी धारणा बनत चाललीय.

जॉब काय करावं ह्याचीच चिंता खूप सतावत आहे. मार्केटमध्ये गेले की अस वाटतेय की मला हे जमणारच नाही. अश्यामुळे मनात वाईट विचार येत आहेत. Negative attitude बनत आहे. Sir please मला यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सांगा. नेमके काय करावे हेच मागील दोन महिन्यापासून कळत नाहीये. खूप जास्त overthinking होतेय. झोप न येणे, Career related overthinking नेमके काय करावं यात confusion, माझे काही तरी चुकतेय अस सारखे सारखे वाटणे. मेंदू थकतच नाहीये, सारखी overthinking करतेय. focus होत नाहीये. ही लक्षणे पण दिसत आहेत.

Market मध्ये फिरल्यावर BA and MA ह्याचा काहीच फायदा नाही, उलट 12 वी असले असते तरी बर झाले अस वाटते आहे हे पण जास्त छळत आहे. काही professional courecs का केला नसेल अस सारख सारख वाटत आहे. अभ्यास करू वाटत नाहीये. मार्केटमध्ये जॉबच्या अपेक्षा वेगळ्याच दिसतायेत की जे माझ्याकडे नाहीये. बाहेर जाण्याची भीती वाटते म्हणून घरीच बसून असतो अन् त्यामुळे सुध्धा खूप overthinking hotey.

यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सुचवा सर. मी स्वतः खूप प्रयत्न करतोय पण मला नेमकेपणाने काय केले पाहिजे हे समजतच नाहीये.

काल तुमची पोस्ट पहिली अन् हे तुम्हाला पाठवण्याचा निर्णय घेतला

--------------------------------------

हा मेसेज स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या त्या प्रत्येकाचा चेहरा आहे. वास्तव फार गंभीर आहे, यावर अभ्यासपूर्वक काम करून काहीतरी करणं आवश्यक आहे. त्या तरुणाशी जवळपास अर्धा तास फोनवर बोललो, त्यांच्या परवानगीनेच हा मेसेज पोस्ट केला आहे. 'तुमच्या सोबत आहे' हा आत्मविश्वास देण्यापर्यंत आलोय... अजून बरंच काम करायचं आहे! त्या थकलेल्या जीवाला मी यातून बाहेर काढणारच!

टीप: UPSC MPSC देऊन अधिकारी झालेल्यांनी मोटिवेशनल भाषणे देऊन महाराष्ट्रातील अख्खी एक पिढी डिप्रेशन मध्ये ढकलली आहे."

#प्रकाशकोयाडे

#prakashkoyade

डॉ. प्रकाश कोयाडे यांच्या वॉल वरून साभार.....

Similar News