दलित आणि वंचितांच्या आक्रोशाला चळवळीचे स्वरुप देणारी दलित पँथर संघटना पुन्हा उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, यासंदर्भात 27 ऑगस्टला आंबेडकरी समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलण्यात आल्याची माहिती दलित पँथरचे संस्थापक सदस्य अर्जुन डांगळे यांनी दिली आहे. या बैठकीला आंबेडकरी तरुणांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अर्जुन डांगळे यांनी केले आहे. दलित पँथर चळवळ पुन्हा उभारण्यासाठी आणि नवा अजेंडा ठरविण्यासाठी ही बैठक घेत आहे, असे अर्जुन डांगळे यांनी सांगितले. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...