बिलकीस बानोच्या दोषींना गुजरात सरकारने मुक्त केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आता याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली गेली आहे. त्यामुळे कोर्ट यावर काय भूमिका घेते ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. एकीकडे पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन महिला सन्मानाचा नारा देत असताना मानवतेचा आणि स्त्रित्वाचा अपमान जाहीरपणे त्यांच्याच गुजरातमध्ये केला गेला आहे. बिलकीस बानोवरील अत्याचार आणि त्यानंतर तिच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या या निर्णयाचा अर्थ काय, प्रत्येक महिलेचा हा अपमान का आहे, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांनी...