मोदी हे करणार आहेत ते करणार आहेत. लॉटरी काढणार आहेत अशा बातम्या पसरल्यामुळे मोदींची लोकप्रियता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे माहीती प्रसारण करणाऱ्या पीआयबीने मोदींच्या कथित घोषणांची फॅक्टचेक करण्याचं काम जोरात सुरु केलं आहे. अच्छे दिन सांगत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला सत्तेची आठ वर्ष चाखायला मिळाली.. सोशल मिडीयाचा हा भस्मासुर आता अक्राळविक्राळ स्वरुप धारण करत असताना भाजप आणि मोदी सरकारवर उटल्यानं २०२४ च्या सत्तेच्या स्वप्नांना सुंरुग तर लावणार नाही ना अशी शक्यता देखील व्यक्त होत आहे...याच पार्श्वभुमीवर प्रमोगंडा, अफवा आणि वस्तुस्थितीवर अभ्यासपूर्ण विवेचन केलं आहे, प्रोपोगंडा पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार रवी आमले आणि ज्येष्ठ पत्रकार विक्रांत पाटील यांच्या यांच्या सोबत मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी....