केवळ एक जोडी कपड्यावर उत्तर प्रदेश, बिहार येथून आलेले तरुण. बेताचे शिक्षण, फार कौशल्य देखील नाही, तरी फेरीवाले, शिकावू टेलर, वेटर, ओझेवाले असे काम करत हळूहळू आपला जम बसवतात. मग भाड्याने दुकान किंवा एखाद्या कामाचा ठेका 4 मित्रांना मिळून घेतात आणि पुढे याच ठिकाणी व्यवसायिक म्हणून पुढे येतात हे निरक्षण आहे इथल्या ग्रामीण भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शेलार, ते सांगत आहेत स्थानिक बहुजनाची मुलं का मागे पडतात ते प्रतिनिधी किरण सोनवणे यांच्यासोबत.