खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या आरोपांमधील हवा पोलीस आयुक्तांनी काढली आहे. पण तरीही हे दाम्पत्य आपल्या आरोपांवर ठाम आहेत. पण आपण लोकप्रतिनिधी आहात त्यामुळे आपले कर्तव्य काय आहे, याचा विचार हे दाम्पत्य करणार की नाही, असा सवाल माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी केला आहे. आरोपींच्या या कागांव्याचा खेळ काय असतो, याचेही विश्लेषण वंजारी यांनी केले आहे.