देशात करोना महामारीच्या लाटेत लाखोंच्या संख्येनं रुग्ण मृत्यूमुखी पडत आहे. करोनाचा फैलाव वेगाने वाढत असून रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाही. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये लॅाकडाऊन लावण्यात आला आहे. अशी सगळी देशात परिस्थिती असताना IPL मॅच का चालवल्यात? असा सवाल बॅंकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी भारत सरकारला केला आहे.
लोकांच्या जीवापेक्षा आयपीएल महत्त्वाची का? करोनाचा उद्रेक होत असताना IPL मॅच कशाला ? मॅच सुरू ठेवण्यामागे फक्त मनोरंजनचं आहे का दुसरं काही? IPL आणि अर्थव्यवस्थेचा काय संबंध ? बीसीसीआयची भूमिका योग्य आहे का? IPL चालू राहुद्या प्रसार माध्यमं का सांगत आहे? यावर बॅंकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांचे विश्लेषण... पाहा व्हिडिओ