शेतकरी पुत्र #Hashtag घेऊन सोशल मिडियावर आक्रमक का आहेत?
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची मुलं गेल्या काही दिवसापासून #soyabean आणि #एकरकमी_FRP हॅशटॅग करत आहेत...
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची मुलं गेल्या काही दिवसापासून #soyabean आणि #एकरकमी_FRP हॅशटॅग घेऊन सोशल मिडीयावर आक्रमक आहेत.. कोरोनाकाळात सगळं बंद असताना शेतीची फॅक्टरी सुरु ठेवणार शेतकरी आज अडचणीत का आला? सोयाबीनचे दर पाडण्याचे षडयंत्र कोणी रचले? कायद्यानं एकरकमी देणं बंधकारक असताना ऊसाचा एफआरपी (FRP) तुकड्यात का दिला जातोय?आमदार- खासदार शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी का मांडत नाहीत? काय आहेत शेतकऱ्यांच्या मनातील वेदना? काय आहेत मागण्या? या मागण्या मान्य झाल्या नाही तर काय होऊ शकते... ऐका शेतकरी पुत्रांच्या व्यथा.. पुजा झोळे, ब्रम्हा चट्टे आणि रणजित बागल यांच्यासह कृषी अभ्यासक दीपक चव्हाण यांच्या सोबत फक्त मॅक्स महाराष्ट्रवर..