पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांचं सरकार पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये स्थापन झालं. त्या दरम्यानच सीबीआयने 17 मेला तृणमूल काँग्रेसच्या मंत्री व नेते आमदार यांना ताब्यात घेतलं. यामध्ये पश्चिम बंगालचे मंत्री फरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी यांचा समावेश आहे. या सर्वांना नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणात कोलकाता सीबीआयने अटक केली आहे.
मात्र, सीबीआयने केलेली ही कारवाई सूडबुद्धीची आहे का? पाहा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केलेले विश्लेषण