सत्यशोधक समाजाला दीडशे वर्ष पूर्ण झाल्या निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत असे सांगून सरस्वती देवीचा फोटो का लावला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. वरील नेत्यांमुळे आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला. शिक्षण घेता आले, मात्र जिला आम्ही कधी पाहिले नाही त्या सरस्वतीचा फोटो शाळांमध्ये का लावावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या वक्तव्यावरुन राजकारणातील नवीन वाद सुरु झाला असून भाजपनं या वादात उडी घेतली आहे. सरस्वती की सावित्रीबाई फुले ?विद्येची देवी कोण ? भाजप प्रवक्त्या प्रेरणा होनराव, ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे, युक्रांदचे संदिप बर्वे यांच्याशी संवाद साधला आहे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...