नवीन ग्रामपंचायत कार्यकारिणीकडे पुरवणी अंदाजपत्रक मांडण्याचं सर्वात पहिलं काम असणार आहे. याकरीता सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामविकास आराखडा (GPDP) समजून घ्यायला हवा. ग्रामविकास आराखड्याकरीता वित्त आयोगासोबत केंद्र आणि राज्याकडून विविध योजनांचेही निधी येत असतात.
या निधीचं नियोजन योग्य प्रकारे केलं तरचं आपल्या गावचा विकास आराखडा पद्धतशीर आखून त्याची अंमलबजावणी करता येईल. कणकवली पंचायत समितीच्या सदस्या हर्षदा वाळके यांच्याकडून ग्रामविकास आराखडा आणि 15 वा वित्त आयोग समजून घेतला आहे पत्रकार साधना तिप्पन्नाकजे यांनी...