राज्यात सत्तेचा संघर्ष शिगेला पोचला असताना अतिवृष्टी आणि अवर्षणामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झाल्यानं शेतकऱ्यांनं आता काय करावे? रब्बी हंगामचा पर्याय असला तरी शेतकऱ्यासोबत मार्केट आहे का? आपत्ककालीन सरकारी नियोजनचा अभाव आहे का? सरकारमधील मंत्री कृषी विद्यापीठांना दोष देऊन अंग झटकत आहेत का? काय आहेत कृषी विद्यापीठांच्या वेदना? अडचणीतील शेतकऱ्याला वाली कोण? तातडीचे आणि दिर्घकालीन उपाय कोणते? दोष कुणाचा? नुकसान कुणाचे? राजकीय धांदलीत दुर्लक्षित गेलेल्या शेती-मातीच्या प्रश्नांचा धांडोळा घेतला आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख, कृषी विश्वेषक दिपक चव्हाण, प्रगतीशील अभ्यासू शेतकरी शिवाजी आवटे आणि भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांच्यासोबत मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी टु-द -पॉईंट चर्चेत...