कोविडनंतरचा जीवघेणा म्युकोरोमायकॉसिस (Mucormycosis) गंभीर आहे का? डॉ. संग्राम पाटील
अवघं जग कोरोनाशी झुंजत असताना भारतात आणि महाराष्ट्रात आता कोविड झाल्यानंतर दुर्मिळ अशा म्युकोरोमायकॉसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य आजाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. हा किती गंभीर आजार आहे?
भारतात आणि महाराष्ट्रात मधेच याचे रुग्ण आढळत आहेत? म्युकोरोमायकॉसिसची लक्षणं काय आहेत? हा आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी? नाकात आणि घशात त्रास का होतो? झाल्यानंतर काय उपचार करावेत? कोविड उपचारातील अति औषधांचा वापर या रोगाला कारणीभूत आहे का? सगळ्या कोरोना झालेल्या रुग्णांनी चिंता करण्याचं कारण नाही. सहव्याधी असणाऱ्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या लाटे बरोबरच म्युकोरोमायकॉसिसचा प्रादुर्भाव कमी होईल.
नाक- कान- घसा तज्ञ डॉक्टर यावर उपचार करतात याविषयी सर्व शास्त्रीय माहिती दिली आहे इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी..