Maratha Reservation : मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळली, विनोद पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या वतीने दाखल केलेले रिव्ह्यू पिटीशन नाकारलेली आहे. याचा अर्थ असा आता अधिकार केंद्र सरकारकडे आहे. योगायोगाने केंद्र सरकारचं लोकसभेचे अधिवेशन आहे तसेच राज्य सरकारचे देखील अधिवेशन आहे. त्यामुळे यामध्ये राज्य सरकारने निर्णय करावा व केंद्राकडे पाठवून पाठपुरावा करावा.तसेच विरोधी पक्षाला विनंती आहे की, आपण केंद्र सरकारच्या मागे लागून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा,अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे.
माझ्या वतीने व राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या रिव्ह्यू पिटीशन चा निर्णय अद्याप बाकी आहे. यामध्ये 50 टक्क्यांची मर्यादा व मागास आयोगाचा अहवाल हा कसा खरा आहे .हा निर्णय अपेक्षित आहे दोघांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा,असं विनोद पाटील म्हणाले.