तरुण युवा-युवती म्हटल्यानंतर धमाल-मस्ती, थिएटर्स, मॉल हे समीकरण दिसून येतं, मात्र विनायक होगाडे नावाच्या तरुण युवकानं याच वयात संत तुकाराम यांच्या कारकिर्दीचा सखोल अभ्यास करून , आपल्या कल्पकतेच्या जोरावर 'डियर तुकोबा' हे पुस्तक साकारलं आहे.
या माध्यमातून तुकाराम महाराज यांच्या काळात मीडिया असता तर त्यांचा संघर्ष कसा राहिला असता? तसेच त्यांची आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा एवढेच नाही तर अगदी सॉक्रेटिस यांच्याशी भेट झाली असती तर कसा संवाद झाला असता? अशा पद्धतीने त्याने हे पुस्तक लिहिलं आहे. त्याच्या या भन्नाट पुस्तकासंदर्भात त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी....