Exclusive : उध्दव ठाकरे थेट शरद पवार यांना म्हणाले होते 'भिऊ नका मी पाठीशी आहे'
राज्याच्या राजकारणात सत्तांतरानंतर अनेक घडामोडी घडल्या. मात्र या घडामोडीदरम्यान ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन करून भिऊ नका मी पाठीशी आहे, असं म्हणाल्याची आठवण सांगितली आहे.
राज्यात सत्तांतर झाले. या सत्तांतरामध्ये शरद पवार (Sharad pawar) यांची अत्यंत महत्वाची भूमिका राहिली आहे. मात्र राज्यात विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे सरकार असताना उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray call to Sharad pawar) यांनी शरद पवार यांना फोन करून भिऊ नका मी पाठीशी असल्याचं म्हटले होते, असं ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी म्हटलं आहे.
राही भिडे यांनी मॅक्स महाराष्ट्रवर बोलताना शरद पवार (Sharad pawar) यांच्यासोबत वार्तांकनासाठी पिंपरी चिंचवडला (Pimpari Chinchwad) एका परिषदेला जात असतानाची एक आठवण सांगितली. यावेळी राही भिडे म्हणाल्या, आम्ही शरद पवार यांच्या गाडीतून निघालो होतो. तेवढ्यात शरद पवार यांना एक फोन आला. त्यावेळी फोनवरील व्यक्ती शरद पवार यांना भिऊ नका मी पाठीशी असल्याचं म्हणाले होते. ती व्यक्ती उध्दव ठाकरे होते, असं राही भिडे म्हणाल्या. त्यावेळी उध्दव ठाकरे शरद पवार यांना भिऊ नका मी पाठीशी आहे, असं म्हणाले होते. मात्र 2019 च्या निवडणूकीनंतर उध्दव ठाकरे यांना आवश्यकता होती. त्यावेळी शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांना भिऊ नको मी पाठीशी आहे, असं म्हणत परतफेड केल्याचा किस्सा ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी सांगितला.