शेअर मार्केटचं गाव...
कधीकाळी उद्योजक आणि पैसेवाल्यांची गुंतवणुकीच ठिकाण म्हणून शेअर मार्केट समजलं जायचं, मात्र हेच शेअर मार्केट आता गावच्या कट्ट्यावर बसणारे पोर चालवतायात, पाहू शेअर मार्केटचं गाव आहे तरी कसा...
औरंगाबाद: शेअर मार्केट हा शब्द तसा शहरी लोकांशी परिचयाचा. पण गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लागली आहेत. त्यामुळे शेतात नांगर जोपणारी तरुण पोरं शेअर मार्केटमध्ये मोठी उलाढाल करताना पाहायला मिळत असून, औरंगाबादचं बिडकीन गाव तर शेअर मार्केटच गाव म्हणून चर्चेत आलं आहे.
औरंगाबाद पासून 20 किलोमीटर असलेल्या 12 हजार लोकसंख्या असलेल्या बिडकीन गावात अंदाजे 20 ते 25 कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतले आहे. काही दिवसांपूर्वी परिसरातील जमिनी एमआयडीसीत गेल्या आणि गावकऱ्यांडे अफाट पैसा आला,त्यामुळे सुरवातीला अनेकांनी बँकेत पैसे गुंतवले, पण बँकेत व्याजदर मिळत नाही, त्यात सुरक्षेची हमी नसल्याने तरुण मुलं शेअर मार्केट कडे वळतायत.
कोरोनाच काळात अनेकांचे नोकऱ्या गेल्या त्यात नवीन व्यवसाय सुरू करणे म्हणजे रिस्क घेण्यासारखं झालं आहे,त्यामुळे इतर ठिकाणी पैसे गुंतवणूक करण्यापेक्षा या भागातील मुलं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत.
काही दिवसांपूर्वी शेअर मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर पडले त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान झाले, मात्र आशा काळात ही या शेतकऱ्यांच्या पोरांनी शेअर मार्केट मधून उत्पन्न मिळवले.
त्यामुळे,शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय, हे आजही अनेक गावातील लोकांना माहीत नाही,तर अनेक असे ग्रामीण भागातील लोकं आहे ज्यांना बँकेत आलेलं शासकीय अनुदान काढण्यासाठी एखाद्याला शिकलेल्या व्यक्तीला सोबत न्यावं लागते, मात्र असे असताना बिडकीन सारख्या गावांतील तरुण मुलं शेअर मार्केट मध्ये कोट्यावधीची गुंतवणूक करून त्यातून नफाही मिळवत आहे.