केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौध्द धर्म बळजबरीने स्वीकारावा लागला, असे वक्तव्य केले होते. त्यावरून काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी रामदास आठवले यांच्यावर टीकास्र सोडले. यावेळी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे वक्तव्य म्हणजे दिवाळखोरीचे लक्षण आहे. मी वैचारिक दिवाळखोरीबद्दल बोलत नसून त्यांची दिवाळखोरी ही अत्यंत वरच्या पातळीची असल्याचे मत भालचंद्र मुणगेकर यांनी मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांच्याशी बोलताना व्यक्त केले.