ऑनलाईन शिक्षणामुळं अनेक मुलं शिक्षणापासून वंचित असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं ऑनलाईन शिक्षण प्रणाली आत्मसात करायला भारत पूर्णपणे तयार आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. पारंपरिक शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण यात काय फरक आहे.
ऑनलाईन शिक्षण शिकवणाऱ्या शिक्षकांनाच ट्रेनिंगची गरज आहे का? अचानकपणे आलेल्या ह्या परिस्थितीत आपले शिक्षक कुठे कमी पडतात का? ग्रामीण भागातील शिक्षकांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामीण शिक्षणावर जास्त परिणाम झाल्याचे दिसून येते का? शिक्षकांनी कोणत्या प्रकारे पूर्व तयारी करणं गरजेचं होतं? या संदर्भात उद्योजक व शिक्षणतज्ज्ञ अश्विन मलिक मेश्राम यांनी केलेले विश्लेषण