दलित महिलांना पूर्ण साडी परिधान करण्याचा अधिकार कसा मिळाला? राम पुनियानी
दलित महिलांना पूर्ण साडी परिधान करण्याचा अधिकार का नव्हता? याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलंय? कसा मिळाला दलित महिलांना पूर्ण साडी परिधान करण्याचा अधिकार? बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडताना ब्राह्मणांच्या वर्चस्वाबाबत काय म्हटलंय? बाबासाहेबांना हार घालणारेच बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे का? पाहा प्रसिद्ध इतिहासकार राम पुनियानी यांचं विशेष विश्लेषण;
जे लोक समाजामध्ये समतेचं स्वप्न पाहतात. त्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 ला रायगड जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला. वास्तविक पाहता दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी मिळावे यासाठी 1923 ला तत्कालीन इंग्रज सरकारने कायदा पास केला. त्या या अगोदर दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिऊ दिलं जात नव्हतं. कायदा पास होऊनही दलितांना त्यांचा हक्क देण्यात आला नाही.
त्यानंतर महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला. हा सत्याग्रह केल्यानंतर तेथील सवर्ण लोकांनी चवदार तळ्याला स्वच्छ केलं. या सर्व घडामोडींबद्दल प्रसिद्ध इतिहासकार राम पुनियानी सांगतात. बाबासाहेब आंदोलन करुन गेल्यानंतर ब्राह्मणांच्याकडून मंत्रोउच्चार करून पाण्याचं शुद्धीकरण करण्यात आलं.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह...
अहिंसात्मक पद्धतीने लोकांना समुह एकत्र करून बाबासाहेबांनी आंदोलन केलं. फक्त पुस्तक लिहून परिवर्तन होणार नाही. याची जाणीव बाबासाहेबांना झाली होती. त्यानंतर बाबासाहेबांनी प्रत्यक्ष कृती करून लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी दलित महिलेला पूर्ण साडी परिधान करण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी बाबासाहेबांनी या महिलांना इतर महिला ज्या पद्धतीने साडी परिधान करतात. त्याच पद्धतीने तुम्हीही साडी परिधान करा. असं या महिलांना सांगितलं.
एकीकडे बाबासाहेबांनी लोकतांत्रिक मुद्यावर काम केलंच दुसरीकडे सामाजिक बाबतील दलितांच्या अधिकारांबरोबरच महिलांच्या अधिकारावर देखील काम केलं. कालाराम मंदीर आंदोलन देखील याच प्रयत्नांचा भाग होता. असं मत डॉ. राम पुनियानी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं आहे.