Flying Smriti : स्मृती मंधाना चा हवेत झेप घेत कॅच व्हायरल

Update: 2021-07-04 06:02 GMT

भारतीयांचं क्रिकेटचं वेड तुम्ही जाणताच. आत्तापर्यंत भारताच्या पुरुष क्रिकेट संघांचेच कौतुक माध्यमांवरुन होताना तुम्ही पाहिलं असेल. मात्र, आता भारताच्या महिला टीमचं देखील माध्यमांवरुन मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

भारताची महिला क्रिकेट टीम India Women team on England Tour सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. सध्या भारत आणि इग्लंड मध्ये तिसरी वन डे सुरु आहे. त्या दरम्यान इंग्लंड ने पहिल्यांदा फलंदाजी करत 219 धावा केल्या. मात्र, या सामनादरम्यान भारताच्या महिला टीमने उत्कृष्ठ बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण केलं.

या क्षेत्ररक्षणामध्ये स्मृती मंधाना ने पकडलेला कॅच सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंधानाने नताली सायवरला कॅच पकडत तिला फिफ्टी करण्यापासून रोखले.

पाहा तो झेल..

Tags:    

Similar News