#restore_MaxMaharashtra : "लोकशाहीपूरक पत्रकारितेवर Youtubeचा सायबर हल्ला"
दलित मुलांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ दाखवला म्हणून Youtubeने मॅक्स महाराष्ट्रचे चॅनेल बंद केले. यावरुन आता महाराष्ट्राभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मॅक्स महाराष्ट्रवर झालेला हल्ला हा लोकशाहीपूरक पत्रकारितेवर Youtubeने केलेला सायबर हल्ला आहे, असा आरोप ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांनी केला आहे.