शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सत्तेतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला आणि विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी स्वबळावर सर्व जागा लढवण्याची तयारी करावी असेही सांगितले. एवढेच नाहीतर अजितदादांनी ऐकले नाही तर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत हे लक्षात ठेवा, असा इशारा देत शिवसेनेला भाजपचा पर्याय आहे, असा सूचक इशाराही दिला आहे. संजय राऊत यांच्या या इशाऱ्याचा अर्थ काय, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....