किराणामालाच्या दुकानात दारू, संभाजी भिडे आक्रमक
राज्य मंत्रीमंडळाने किराणामालाच्या दुकानात दारू विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून संभाजी भिडे आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाभारतातील संदर्भ देत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. यावेळी संभाजी भिडे या विषयावरून आक्रमक झाले.;
राज्य मंत्रीमंडळाने किराणामालाच्या दुकानात दारू विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून संभाजी भिडे आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाभारतातील संदर्भ देत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. यावेळी संभाजी भिडे या विषयावरून आक्रमक झाले.
राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयावरून आर आर पाटील यांची आठवण काढली. आबांनी बारगर्लसंबंधी घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख करत आबा असते तर असा निर्णय घेणारांना देहांताची शिक्षा दिली असती, असे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले. त्याबरोबरच किराणामालाच्या दुकानात दारू विक्रीला परवानगी दिल्याने त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावा सरकारकडून केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर शेतकऱ्यांचा फायदाच करायचा असेल तर त्यांना गांजा लावण्याची परवानगी का देऊ नये? असा सवाल भिडे यांनी विचारला. तसेच भिडे यांनी लिव्ह इन रिलेशनशीप वरून न्यायव्यवस्थेवरही टीका केली. मात्र या सगळ्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले व ठाकरे सरकारवर कठोर टीका केली.