गेल्या २९ दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू ठेवले आहे. पण केंद्र सरकार माघार घ्यायला तयारी नाहीये, त्यामुळे यामध्ये आता राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह गुरुवारी राष्ट्रपतींची भेट घेतली.