समाजसेवेचा आदर्श पॅटर्न, 'पुणे डोनेट हँड अँप'

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-06-29 07:43 GMT
समाजसेवेचा आदर्श पॅटर्न, पुणे डोनेट हँड अँप
  • whatsapp icon

कोरोना काळात सामाजिक भान जपत पुण्यातील काही तरुणांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.

आपल्याकडील वापरलेल्या जुन्या वस्तू गरजूंना मदत म्हणून देण्यासाठी पुण्यातील युवकांनी 'पुणे डोनेट हँड'नावाचे मोबाईल अँप तयार केले आहे. यामध्ये नागरिकांनी वापरलेली पुस्तके,फर्निचर, मोबाईल फोन, संगणक,सायकली इतर गरजूंना भेट देण्यासाठी व गरजूं नागरिक,विद्यार्थी यांना ते मिळावे यासाठी हे एप्रिल तयार करण्यात आले आहे. पुणे डोनेट हँड अँपचे कर्वेपुतळा येथे लोकार्पण करण्यात आले. पुणे शहरातील युवक प्रवीण महाजन यांनी अँपची निर्मिती केली आहे.

हे ऍप पूर्णपणे पारदर्शक स्वरूपातले आहे. त्याचसोबत पूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर वस्तू घेण्यासाठी पुणे डोनेट हँडचे स्वयंसेवक स्वतः ज्यांना वस्तू द्यायची असेल त्यांना संपर्क करून वस्तू ताब्यात घेतात आणि गरजूंना पोहोचवण्याचे कामही करतात.

Full View

Tags:    

Similar News