Exclusive : युतीचं घोडं अडलं कुठं? प्रकाश आंबेडकर यांनी फोडलं उद्धव ठाकरे यांच्यावर खापर
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली. मात्र सध्या ही युती कोणत्या टप्प्यावर आहे? याविषयी प्रकाश आंबेडकर यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.;
उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवशक्ती-भीमशक्ती (Shivshakti Bhimshakti) युतीची घोषणा केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत होता. मात्र त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची युती फक्त ठाकरे गटाशी की त्यांना महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) घ्यायचं? यावरून बरेच खलबतं झाले. परंतू यानंतर अजूनही ही युती थांबल्याचं चित्र आहे. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बातचित केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव शिवसेना (Shivsena UBT) जी आहे त्यांना अजून ठरवायचं आहे की, त्यांना महाविकास आघाडीबरोबर राहायचं आहे की आमच्याबरोबर युती करायची आहे. आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घेऊन जायचं आहे की नाही? याचा निर्णय पहिल्यांदा शिवसेनेला करायचा आहे. तो अजून त्यांचा झालेला नाही. त्याच्यामुळे सध्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतात. बोलणारे जे आहेत ते भेटतात. चहा पितात. मस्तपैकी गप्पा मारतात. पण सध्या ठाकरे गटाचे केंद्रीय नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे यांनी निर्णय न घेतल्यामुळे हे सगळं थांबल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला.