कोरोना काळात आपल्याकडील लोकप्रतिनिधींनी उधळलेली मुक्ताफळं तुम्हाला माहिती आहेत का? भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह पासून भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी कोरोना संदर्भात केलेली वक्तव्य काय दर्शवतात. अलिकडे बाबा रामदेव यांनी अलोपॅथी संदर्भात केलेलं वक्तव्याचा अर्थ का? जनेतेने निवडून दिलेले इतके हुशार लोकप्रतिनीधी अशी वक्तव्य का करतात. बाबा रामदेव एका पंतजली सारखा उद्योग समुह चालवात. त्यांच्या सारख्या हुशार व्यक्तीकडून देखील वाक्य का येतात? यामागे काही षड्यंत्र आहे का? ही वक्तव्ये म्हणजे अंधश्रद्धाच आहे. मात्र, या वक्तव्याचा विचार या पलिकडे जाऊन करायला हवा असं मत मुक्ता मनोहर यांनी व्यक्त केलं आहे.
आपल्या देशातील 130 कोटी जनतेला आरोग्य यंत्रणा पुरवण्यास सरकार सक्षम आहे का? अॅलोपॅथीचं वाद निर्माण करुन बाबा रामदेव यांनी काय साध्य केलं? वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा म्हणून सरकार काही प्रयत्न करत आहे का? कोरोना काळात गेलेल्या नोकऱ्या परत येतील असं आश्वासन दिली जात आहे. मात्र, या नोकऱ्यांची शाश्वती कोण देणार? जुन्या गोष्टींना नव्या नजरेने पाहायला आपण तयार आहोत का? या संदर्भात मुक्ता मनोहर यांनी केलेले विश्लेषण नक्की पाहा