प्रजासत्ताक दिनी महिलेवर सामुहिक अत्याचार
एकीकडे राजधानी दिल्ली मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असताना दिल्लीच्या कस्तुरबा नगर भागात एका महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. सदर पीडित महिलेची तोंडाला काळे फासून धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक संताप व्यक्त करत आहेत.;
एकीकडे राजधानी दिल्ली मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असताना दिल्लीच्या कस्तुरबा नगर भागात एका महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. सदर पीडित महिलेची तोंडाला काळे फासून धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक संताप व्यक्त करत आहेत.
दिल्लीमध्ये २६ जानेवारीला मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात असताना रस्त्यावर अशा प्रकारे एका महिलेची धिंड काढली गेल्याने दिल्लीच्या कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दिल्ली येथील कायदा सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सदर आरोपींविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे.