मराठी भाषा दिन: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही?
आज जागतिक मराठी भाषा दिवस... या दिवसाचं औचित्य साधत मराठी भाषेची सद्यस्थिती नेमकी कशी आहे? या संदर्भात ज्येष्ठ इतिहासकार आणि लेखक संजय सोनवणी यांच्याशी मॅक्समहाराष्ट्र ने बातचीत केली. यावेळी त्यांनी मराठी भाषेला अद्यापही अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला नाही? असा सवाल मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना केला आहे.;
महाराष्ट्रात मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेग-वेगळे उपक्रम राबविले जातात. मराठी भाषिकांची लोकसंख्या ११ कोटी असूनही मराठी भाषेला ज्ञान भाषेचा दर्जा मिळालेला नाही. संस्कृत भाषेला इतकं महत्त्व का आहे? तसेच मुलांना मातृभाषेतील शिक्षण देणं का महत्त्वाचं आहे. भाषेचा न्यूनगंड आणि मराठी भाषेचा इतिहास सांगताना लेखक संजय सोनवणी यांनी संस्कृत भाषेचा अभिजात दर्जा शासनाने काढून घेण्याची मागणी केली आहे.