शरद पवार हे सांगतात एक आणि करतात दुसरे अशी टीका त्यांच्यावर होते, पण गेल्या काही वर्षात शरद पवार हे खरं बोलू लागले आहेत, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले आहे. मॅक्स महाराष्ट्रच्या चर्चासत्रात कुमार सप्तर्षी यांनी हे वक्तव्य केले आहे.