हेलीकॉप्टर आली वरुन गेली, सरकारचं कोणीच आलं नाही, पूरग्रस्तांची संतप्त प्रतिक्रिया
कोकणात झालेल्या मुसळधार पावसाने होत्याचं नव्हतं केलं. कोकणातील रायगड, आणि रत्नागिरी हे जिल्हे मोठ्या प्रमाणात बाधीत झाले. त्यातील रायगड जिल्ह्यातील महाड ह्या तालुक्याला मोठा फटका बसला. तालुक्यातील शहरासह गावे पाण्यात बुडाली. त्यातील एक गाव म्हणजे राजेवाडी गाव.
जे सावित्री नदीला लागून आहे. हे गाव तर बूडून संपूर्ण उद्ध्वस्त झालेच. मात्र, पूर ओसरला पूरानंतर गावाची स्थिती खूपच बिकट अशीच झाली आहे. यावेळी रहिवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या. मोडलेला संसार कसा उभा करणार? सरकारची मदत कधी मिळणार? मोडून पडलेल्या घरात आम्ही कसं राहायचं? हेलीकॉप्टर आली वरुन गेली. सरकारने आमच्यासाठी काही केलं नाही. छपरावर बसून आम्ही जीव वाचवला. अशा शब्दात नागरिकांनी आपल्या व्यथा मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केल्या...