पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांनी आपली बाजू मांडल्यानंतर या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. माजी पोलिस अधिकारी वाय. सी. पवार यांनी या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं. मी जर तपास अधिकारी असतो तर संजय राठोड यांना चौकशीसाठी ताब्यत घेतले असते, असं पवार यांनी म्हटले आहे. एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांचा तपास कसा चालतो किंवा पोलिसांनी कसा तपास करावा याबात असलेल्या नियमांची आणि कायद्याची माहितीही त्यांनी दिली.