शिधावाटप कार्यालयात भ्रष्टाचाराचं शिष्टाचार

सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणीचा प्रत्यय प्रत्येकाला येतो. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार नवीन नाही परंतु शिधावाटप कार्यालयांमध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नाही असा अनुभव येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शिधावाटप कार्यालयामध्ये आमचे प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी उघडकीस आणलेला रेशन घोटाळा...;

Update: 2021-01-02 13:15 GMT

गेली अनेक महिने स्थानिक नागरिक अंबरनाथ येथे असणाऱ्या शिधावाटप कार्यालयाच्या भ्रष्टयाचाराला कंटाळून गेले होते. त्यानी 'वॉर अंगेस्ट करप्शन' या तरुणांच्या समुहासोबत संपर्क केला. यासमुहाचे प्रमुख महेश इनकर यानी सांगितले की, आम्ही देखील राशन ऑफिस मधील भ्रष्टाचाराचा अनुभव घेतला आहे, त्यामुळे अश्विनी पाटिल जी नागरिकांना प्रत्येक कामात अडवणुक करत होती तिचे स्टिंग ऑपरेशन करायचे ठरवले. याकामात येथील एका व्यक्तिने मदत केली आणि तुम्ही पाहु शकता अश्विनी पाटील या सरळ व्यक्तिकडून 1000 रुपये स्विकारत आहेत.आणि बाकीचे पैसे, इतर कामा बद्दल पण विचारत आहेत

वास्तविक रेशन कार्ड ही गोरगरीब लोकांची गरज असते, त्यासाठी ते भटकत फिरत असतात आणि हे अधिकारी नवीन नाव टाकन्यासाठी, नाव कमी करण्यासाठी, उतपन्न कमी दाखविन्यासाठी अश्या सर्व कामात काही ना काही त्रुटी दाखवून किंवा काम रखडवून ठेवून गोर गरीब लोकांच्या कडून पैसे उकळत असतात.

याबद्दल स्थानिक अधिकारी राठोड यांना विचारणा केली असत्ता, मी 12 दिवस रजेवर आहे असे सांगून याप्रकरणात बोलन्यास नकार दिला, दूसरे अधिकारी गायकवाड़ यांना फोन केला असत्ता मी रजेवर आहे, मला काही माहित नाही म्हणे. अश्विनी पाटिल यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही

Full View
Tags:    

Similar News