सध्याच्या काळात इंटरनेट तुमच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. इंटरनेटशिवाय सकाळची सुरुवात होणं ही कठीण आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांसाठी इंटरनेटचा सर्वाधिक वापर पाहायला मिळतो. इंटरनेट या आभासी जगात रमण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे.
कोरोना महामारीमुळे तर भारतात सर्वाधिक इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. एवढंचं नव्हे तर अधिकृतरित्या आता शिक्षणासाठी पहिलीपासूनच्या मुलांना देखील मोबाईल, इंटरनेटचा वापर बंधनकारक झाला आहे.
सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्युब इ. सोशल नेटवर्किंग साईटमुळे प्रत्येकांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळतेय. 24 तास ऑनलाईन असलेल्यांच्या मेंदूची वाटचाल ही ऑफलाईन होण्याच्या दिशेने सुरु आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत मोबाईल, सोशल मीडियाची क्रेझ वाढत चालली आहे.
या सगळ्यांचा परिणाम मानसिक आरोग्यासोबतच शारिरीक आरोग्यावर कसा होतो? इंटरनेटच्या जाळ्यात वाईट पद्धतीने अडकलेली तरुणाई कशी बाहेर पडेल? विविध अँप कसे धोकादायक आहेत? कोरोनामुळे इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे मानसिकतेवर नेमके काय परिणाम झाले आहे. आणि त्यावर उपाय काय? या संदर्भात मॅक्स महाराष्ट्रचा माझं मानसिक स्वास्थ या विशेष कार्यक्रमात औद्योगिक मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी केलेलं महत्त्वपूर्ण विश्लेषण नक्की पाहा...
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पडलेल्या तुमच्या मनातील प्रश्न खाली दिलेल्या इमेल आयडीवर पाठवू शकतात. vrushali31@gmail.com
दररोज सकाळी ११ वाजता 'माझं मानसिक स्वास्थ' हा विशेष कार्यक्रम पाहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर