बुद्धिबळ हा खेळ अनेकांचा आकर्षण बिंदू असतो. शिवाय या खेळायला ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा लाभली आहे, मात्र आता याच खेळात दृष्टी बाधित व्यक्ती सुद्धा माहीर होत असल्याचे चित्र आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावर अंधानी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. blind welfare organisation यांच्या वतीने पुणे येथे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दृष्टी बाधित व्यक्ती बुद्धिबळ हा खेळ कसा खेळतात? दिव्यांगांसाठी क्रीडा क्षेत्रात कोणते धोरणात्मक बदल असावेत? यासंदर्भात पुणे येथून थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...