थर्माकॉलच्या गणपतीवर सरकारची बंदी; मग बाप्पाची प्रतिष्ठापना कशी करायची?
कोरोनानंतरचा पहिलाच गणेशोत्सव येत आहे. मात्र या गणेशोत्सवात सरकारने थर्माकॉलवर बंदी घातली आहे. मग गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना कशी करायची? जाणून घेण्यासाठी वाचा....;
लवकरच गणेशोत्सव सुरु होणार आहे. दोन वर्षाच्या कोविड संकटानंतर येणारा यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात होणार हे नक्की... पण सरकारने बंदी घातलेल्या थर्माकॉलवर पर्याय काय? Ecofriendly गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा कशी करायची? कोणत्याही आधाराशिवाय पुठ्ठ्याची मखर कशी तयार होते? पर्यावरण पुरक गणपतीची सजावट कशी करायची? या इकोफ्रेंडली गणपती सजावटीला नानासाहेब शेंडकर यांच्या शोधाची जोड मिळालीय..निसर्गाने दिलेलं निसर्गाला पुन्हा परत देणाऱ्या `उत्सवी` चळवळीचा विशेष रिपोर्ट....