एकीकडे ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होत असताना दापोली तालुक्यामधील दाभोळ पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा आहे. राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्याची कमतरता आहे. म्हणून दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वैभव दळी याची तक्रार करत बसले नाही. तर ही वेळ रडायची नाही तर लढायची आहे. असं म्हणत योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करत ते २२ गावामध्ये आरोग्य सेवा पुरवत आहेत. या २२ गावांमध्ये प्रत्येक उपकेंद्रात लसीकरण आणि टेस्टिंग सुरु आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण आणि टेस्ट ही दोन सूत्रे त्यांनी हाती घेतली आहेत. काय आहे डॉ. वैभव दळी यांचा 'दाभोळ पॅटर्न'