छत्रपती शिवाजी महाराज आणि बौद्ध परंपरा...

Update: 2022-10-18 15:04 GMT

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासावर आणि वर्तमानावरही प्रभाव टाकणारे अभूतपूर्व व्यक्तित्त्व... त्यांच्या मूल्याधिष्ठित नीतीमानतेमुळे त्यांच्या व्यक्तीमत्त्वास प्रखर तेजस्विता प्राप्त झालेली... महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना तत्कालीन भूगोल आणि त्या भूगोलाला व्यापून असणारी प्रतीके आणि प्रतिमाने यांचाही साकल्याने विचार केला जाणे महत्त्वाचे... त्या अनुषंगाने शोध घेतला असता तत्कालीन महाराष्ट्रभूमीवर सर्वदूर विखुरलेल्या, पसरलेल्या आणि जनमानसात खोलवर रुजलेल्या बौद्ध परंपरेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव छत्रपतींची नीती आणि व्यक्तीमत्त्व यांवर पडल्याचे स्पष्ट होते..अलक्षित विषयाच्या अनुषंगाने तपशीलवार मांडणी केली आहे ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलसचिव डॉ.अलोक जत्राटकर यांच्यासोबत...साभार 'आ' लोकशाही


Full View

Tags:    

Similar News