डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त अंनिस तर्फे विवेक जागर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याखानमालेत ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय लोकशाही आणि विवेकवाद्यांपुढील आव्हानं या विषयावर साईनाथ यांचे व्याख्यान झाले.